Wings India 2022: संजय घोडावत ग्रूपच्या स्टार एअरला बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wings India 2022 Star Air
Wings India 2022: संजय घोडावत ग्रूपच्या स्टार एअरला बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन पुरस्कार

Wings India 2022: संजय घोडावत ग्रूपच्या 'स्टार एअर'ला बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन पुरस्कार

Wings India 2022: विंग्ज इंडिया २०२२ चा बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन हा पुरस्कार संजय घोडावत ग्रूपच्या 'स्टार एअर'ला देण्यात आला. नागरी विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशातील ज्या ठिकाणी फारशी विमानसेवा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी स्टार एअरतर्फे गेली तीन वर्षे कमी दरात विमानसेवा सुरु आहे. स्टार एअरसाठी हा पुरस्कार म्हणजे मोठाच बहुमान असून ग्राहकांच्या स्टार एअरवरील विश्वासाची ती पावती आहे, असे अध्यक्ष संजय घोडावत यांनी सांगितले.(Sanjay Ghodawata Group's Star Air Award for Best Domestic Airline)

हेही वाचा: उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणारा अटकेत

स्टार एअरची विमाने सध्या मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद या शहरांबरोबरच तिरुपती, जामगर, सुरत, नाशिक, जोधपूर, इंदूर, गाझियाबाद (हिंडन), अजमेर (किशनगड), बेळगावी, हुब्बळ्ळी, कलबुर्गी या शहरांनाही सेवा देतात. लौकरच ही विमानसेवा नागपूरहून देखील सुरु होणार आहे. विंग्ज इंडिया २०२२ हा नागरी हवाईवाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम असून यात हवाईवाहतुकीच्या समस्या, नव्या संधी, बदल, नवे उद्योग, गुंतवणुक, धोरणे, नवे मार्ग याबाबत चर्चा होते.

Web Title: Wings India 2022 Sanjay Ghodawata Groups Star Air Award For Best Domestic Airline

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..