पोलिसाने पावती केली; वायरमनने पोलिस ठाण्याची वीजच तोडली

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चलन फाडल्यास बऱ्याचदा विनवणी, हुज्जत घातली जाते. काही वेळा या पोलिसांना मारहाणही केली जाते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये तर वेगळाच किस्सा घडला आहे. तेथील वीज वितरण कंपनीच्या वायरमनने पोलिस ठाण्याचीच वीज कापत बदला घेतला आहे.

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी चलन फाडल्यास बऱ्याचदा विनवणी, हुज्जत घातली जाते. काही वेळा या पोलिसांना मारहाणही केली जाते. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये तर वेगळाच किस्सा घडला आहे. तेथील वीज वितरण कंपनीच्या वायरमनने पोलिस ठाण्याचीच वीज कापत बदला घेतला आहे.

वायरमनला वीज वितरण कंपनीने फिरोजाबाद जिल्ह्यातील आग्रा शहराच्या शेजारचा विभाग दिला आहे. या ठिकाणी एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने दुरुस्तीसाठी हा वायरमन गेला होता. मोटारसायकलवरून माघारी परतताना त्याला पोलिसांनी विना हॅल्मेट पकडले आणि 500 रुपयांची पावती फाडली. वायरमनने पोलिसांना त्याच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याला दंड भरायला लावला. याचा बदला घेण्याच्या भावनेतून या वायरमनने चक्क त्या पोलिस ठाण्याची वीजच कापली. उप निरीक्षक रमेश चंद्रा यांनी त्याला दंड आकारला होता. 

वायरमनने चंद्रा यांना त्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावून दिला. त्यांनी वायरमनला माफ करण्यास सांगितले, मात्र वाहतूक पोलिसांनी त्यांना माफ केली नाही. आता वायरमन आणि त्याच्या अधिकाऱ्याने या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरविले. या वायरमनने या पोलिस ठाण्याची वीजच खंडीत केली. या पोलिस ठाण्याकडून वीज वितरण कंपनीचे 6.62 लाख रुपये थकलेले आहेत. हे कारण देत वीज वितरण कंपनीने या पोलिस ठाण्याची वीजच बंद केली आहे.

या प्रकरणावर पोलिसांकडून स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, वायरमन श्रीनिवास यांना कारवाईसाठी बोलविण्यात आले होते. पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे 1.15 कोटी रुपयांचे बिल भरलेले आहे. उर्वरित बिलही लवकरच भरण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wireman took revenge he cut police stations power supply