फक्त 15 दिवस थांबा; भारतातही धावेल इंजिनविरहीत रेल्वेगाडी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : इंजिनविरहीत टी-18 रेल्वेगाडीची चाचणी रेल्वेने यशस्वीरीत्या पूर्ण केली असून, आणखी फक्त पंधरवड्याची प्रतीक्षा त्यासाठी आहे. 15 डिसेंबरपासूनच दिल्ली-भोपाळ मार्गावर ही गाडी प्रत्यक्ष धावण्यास सज्ज असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

या गाड्यांची आवश्‍यक तेवढ्या प्रमाणात निर्मिती झाल्यावर त्या सध्याच्या शताब्दी गाड्यांची जागा टप्प्याटप्प्याने घेतील. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या गाडीची चाचणी पूर्ण झाली असून, काही तांत्रिक मंजुऱ्या मिळाल्यानंतर ही गाडी प्रत्यक्ष धावेल, असेही सांगण्यात आले. 

सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात संपूर्ण विजेवर चालणाऱ्या इंजिनविरहीत रेल्वेगाड्यांची कल्पना प्रत्यक्ष कार्यवाहीच्या पातळीवर सुरू झाली. दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर संपूर्ण इंडजिनविरहीत असलेल्या 'टी-18' या गाडीच्या यशस्वी चाचणीनंतर आता रेल्वेने 'टी-20' गाड्यांच्या निर्मितीवर भर दिला आहे. या गाड्या इंजिनरहीतच असतील व त्या सध्याच्या राजधानी गाड्यांची जागा घेतील. 

रेल्वेने टी-18 गाड्यांची प्रत्यक्ष सुरवात येत्या 15 डिसेंबरपासून करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. मुरादाबाद-बरेली दरम्यान घेतलेली या गाडीची पहिली चाचणी यशस्वी झाली. ही गाडी 90-120 प्रती किमी वेगाने अंतर पार केले. याच आठवड्यात या गाडीच्या ताशी 120-160 व ताशी 200 किमी वेगाने धावण्याबाबतच्या चाचण्या पूर्ण होतील व नंतर प्रत्यक्ष प्रवासी गाडी चालविण्याची तयारी सुरू होईल. त्यासाठी किमान आठ दिवस लागू शकतात. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रवासी गाडीचे उद्‌घाटन करण्याबाबत रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात निर्मिती झालेली ही पहिली गाडी आहे. 

जागतिक दर्जाची स्थानके सज्ज 
देशातील पहिली दोन जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके सन 2019 च्या प्रारंभी तयार होत आहेत. अहमदाबाद अर्थात कर्णावती (गुजरात) व हबीबगंज (मध्य प्रदेश) या दोन्ही स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, भारतीय रेल्वे स्थानक विकास प्राधिकरणाने (आयआरएसडीसी) 700 कोटी रुपये खर्च करून विमानतळांच्या धर्तीवर ही स्थानके तयार केली आहेत. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातच दोन्ही स्थानकांवरून वाहतूक सुरू करण्याचे रेल्वे बोर्डाचे प्रयत्न आहेत. दोन्ही स्थानके सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) विकसित करण्यात आलेली आहेत.

Web Title: Without engine railway to start operations in India in December