मोटारीतून मुलाला फेकून देत केला सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश): धावत्या मोटारीतून महिलेच्या तीन वर्षाच्या मुलाला बाहेर फेकून दिल्यानंतर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 7) सायंकाळी येथे घडली आहे.

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश): धावत्या मोटारीतून महिलेच्या तीन वर्षाच्या मुलाला बाहेर फेकून दिल्यानंतर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 7) सायंकाळी येथे घडली आहे.

जिल्हाचे महामार्ग पोलिस अधिक्षक ओमबिर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-डेहराडून महामार्गावर धावत्या मोटारीमध्ये 26 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्कारापूर्वी पीडित महिलेच्या तीन वर्षाच्या मुलाला मोटारीतून बाहेर फेकून देण्यात आले होते. परंतु, स्थानिकांनी मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी सुरू असून, अहवाल अद्याप हाती आलेला नाही.

दरम्यान, पीडित महिलने दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, आर. के. मेहता नावाच्या एकाने नोकरी मिळवून देतो म्हणून बोलावले होते. मोटारीत बसल्यानंतर मुलाला मोटारीतून बाहेर फेकून दिले व मेहतासह त्याच्या मित्राने बलात्कार केला. बलात्कारापूर्वी दोघांनी काही तरी प्यायला दिले होते.

Web Title: Woman Allegedly Gang Raped In Moving Car After Her 3 Year Old Was Thrown Out