स्वत:च्या मुलीचा खून करणाऱ्या महिलेला अटक?

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

कोलकाता - स्वत:च्या मुलीचा खून करण्याचा आरोप असलेल्या महिलेला पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोलकाता - स्वत:च्या मुलीचा खून करण्याचा आरोप असलेल्या महिलेला पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रविवारी मुर्शिदाबादमधील बेलडांगा परिसरात तांजिला बीबी या महिलेने आपल्या स्वत:च्या 16 वर्षांच्या मुलीचा खून केला. रविवारी रात्री उशिरा तांजिलाच्या शेजारी राहणाऱ्यांना त्यांच्या घरातील एका खोलीत तांजिला सोबत त्यांची दोन मुले दिसली. एका मुलगी त्याच खोलीत छतावरील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. शेजाऱ्यांनी संबंधित मुलीला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला पण त्यास तांजिलीने विरोध केल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. तांजिलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा दावा महिलेने केल्याची माहिती बेलडांगा पोलिस स्थानकातील पोलिस निरीक्षक मृणाल सिंह यांनी दिली. "शाळेमध्ये झालेल्या किरकोळ भांडणामुळे शनिवारी रात्री मुलीने आत्महत्या केल्याची माहिती संबंधित महिलेने दिली आहे. आम्ही शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहात आहोत', अशी माहिती मृणाल सिंह यांनी दिली.

Web Title: woman arrested for killing daughter in west bengal