....म्हणून पतीचे गुप्तांग कापले!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सततच्या वादामुळे जयंथीने चाकूने पती सेंथमराई (वय 55) चे लिंग कापले. गावकऱ्यांनी सेंथमराई यांना वेल्लूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले.

तामिळनाडू : येथील वेल्लूर पोलिसांनी बुधवारी (ता. 1 ऑगस्ट) 45 वर्षीय महिलेला पतीच्या गुप्त अंगावर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. या महिलेचे परपुरुषाशी अनैतिक संबंध होते. याचा सुगावा तिच्या पतीला लागला होता. या जोडप्यात कायम भांडण व्हायचे. या वादातूनच महिलेने हे पाऊल उचलल्याचे कळते. 

वेल्लूर जिल्ह्यातील थुराइमुलाई गावात ही घटना घडली आहे. जयंथी वर खूनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता. 30 जुलै) सकाळी 6:30 वाजता ही घटना घडली. सततच्या वादामुळे जयंथीने चाकूने पती सेंथमराई (वय 55) चे लिंग कापले. गावकऱ्यांनी सेंथमराई यांना वेल्लूरच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यानंतर त्यांना राजीव गांधी सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. 

रविवारी (ता. 29 जुलै) जयंथी आणि सेंथमराई या जोडप्याने गावातील मंदिराच्या एका उत्सवात भाग घेतला होता. उत्सवातील कार्यक्रम सुरु असताना जयंथी तेथून न सांगता अचानक निघून गेली. सेंथमराईला ती बराच वेळ दिसली नाही. म्हणून तो आपल्या पत्नीच्या शोधात निघाला. तेव्हा ती गावातल्याच एका पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. सेंथमराईने जयंथी आणि तिच्या प्रियकराला हे प्रकरण सगळ्या गावकऱ्यांसमोर उघड करेन अशी धमकी दिली. या रागातूनच जयंथीने सेंथमराईच्या गुप्त अंगावर हल्ला चढवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

      

Web Title: Woman bites off her husbands penis in Tamilnadu