रुग्णालयातील प्रसुतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

एक महिला फरशीवर प्रसुती झालेली दिसत आहे. यावेळी महिलेला मदत करण्याऐवजी काहीजण ही घटना मोबाइल शुटींग करण्यात व्यस्त होते.

फरुखबाद (उत्तर प्रदेश): राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेची रुग्णालयाच्या वरांड्यामध्येच प्रसुती झाली. विशेष म्हणजे महिलेला मदत करण्याऐवजी नागरिक मोबाईलमध्ये शुटींग करण्यात व्यस्त होते. प्रसुतीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या वरांड्यामध्ये एक महिला फरशीवर प्रसुती झालेली दिसत आहे. यावेळी महिलेला मदत करण्याऐवजी उपस्थित फक्त पाहत उभे होते. तर काहीजणांनी ही घटना मोबाइल शुटींग करण्यात व्यस्त होते. व्हायरल झालेल्या संबंधित व्हिडिओमध्ये महिला जमिनीवर झोपलेली दिसत असून, बाजूला सगळीकडे रक्त पसरलेले दिसत आहे. नुकतेच जन्मलेले बाळ वरांड्यातील एका बाजूला कोपऱ्यात कापडात गुंडाळलेले दिसत आहे. काही वेळाने महिलेसोबत आलेली एक महिला बाळाला उचलून घेते. काही वेळानंतर डॉक्टर घटनास्थळी येऊन महिलेला प्रसुतीगृहात घेऊन जातात.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी मोनिका राणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णायाचे अधीक्षक डॉ. कैलाश म्हणाले, 'महिला एका वाहनामधून रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. वॉर्डमध्ये दाखल होण्यापूर्वीच प्रसुती झाली.' महिलेचा पती सुजीत म्हणाले, 'रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी जागा शिल्लक नव्हती. यामुळे पत्नीची वरांड्यामध्येच प्रसुती झाली.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman Delivers Baby In Hospital Corridor and video viral