रुग्णालयांनी उपचारांस नकार दिल्याने महिलेने रस्त्यावर दिला बाळाला जन्म

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

सुनिता असे संबंधित महिलेचे नाव आहे. सुनिता या श्रावस्ती जिल्ह्यातील भिंगा गावात राहत आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी श्रावस्तीपासून 40 किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांच्यावर उपचारांस रुग्णालय प्रशानसनाने नकार दिल्याचा आरोप सुनिताच्या कुटुंबियांनी केला.

श्रावस्ती : उत्तरप्रदेशमधील एका गरोदर महिलेने रस्त्यावरच एका बाळाला जन्म दिला. या महिलेला उत्तरप्रदेशमधील दोन रुग्णालयांनी उपचारांस नकार देत इतर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र, उपचारांअभावी तिची रस्त्यावरच प्रसूती झाली.

सुनिता असे संबंधित महिलेचे नाव आहे. सुनिता या श्रावस्ती जिल्ह्यातील भिंगा गावात राहत आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी श्रावस्तीपासून 40 किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांच्यावर उपचारांस रुग्णालय प्रशानसनाने नकार दिल्याचा आरोप सुनिताच्या कुटुंबियांनी केला.

याबाबत सुनिताचे पती रमेश म्हणाले, ''माझ्या पत्नीला प्रसूती वेदना होऊ लागल्यानंतर मी तिला सिरसिया रुग्णालयात रुग्णवाहिकेने नेले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने मला जिल्हा रुग्णालय घेऊन जाण्याचा सल्ला दिला. आम्ही भिंगा येथील जिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बाहरायची येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. माझ्याकडे पैसे नसल्याने आम्ही संबंधित रुग्णालयात गेलो नाही. परिणामी माझ्या पत्नीची रस्त्यावरच प्रसूती झाली''.
 
Web Title: Woman Delivers Baby on road after 2 UP hospitals allegedly deny Admission