तीन दिवसांच्या उपासमारीमुळे महिलेचा मृत्यू  

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

गिरीधी (झारखंड) : रेशन कार्ड जवळ नसल्याने व सलग तीन दिवस काही खायला न मिळाल्याने 58 वर्षीय सावित्री देवी यांचा रविवारी (ता. 3) मृत्यू झाला. रेशन कार्डवर गरिब जनतेसाठी स्वस्त दरात धान्य मिळते पण याचा लाभही काहींना घेता येत नाही. उपासमारीमुळेच देवी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. 

'अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे देवी यांना रेशन कार्ड उपलब्ध झाले नाही व त्यामुळे त्यांना अन्नापासून वंचित रहावे लागले', असे जिल्हाधिकारी शितल प्रसाद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

सावित्री देवी यांची सून सरस्वती यांनीही 'आम्ही तीन वेळा विनंती करूनही आमच्याकडे दुर्लक्ष केले गेले व आम्हाला रेशन कार्ड मिळाले नाही' अशी तक्रार केली. सावित्री देवी यांच्या दोन मुलांचे हातावर पोट आहे. अशा परिस्थितीत काही वेळा कोणत्याही प्रकारचे अन्न खायला मिळत नाही. काही वेळी दुसऱ्यांकडे मागून खावे लागते. 

'उपासमारीमुळे होणाऱ्य़ा मृत्यूला प्रशासनाचा व अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबादार आहे.' असे कायदेतज्ज्ञ जगन्नाथ माहतो यांनी सांगितले. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्येही अशी उपासमारीमुळे महिला मृत पावल्याची घटना आहे.     

Web Title: woman dies because of starvation no food for 3 days