युवतीला मोटारीबाहेर ओढून 10 जणांनी केला सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

लुधियाना (पंजाब): एका 21 वर्षीय युवतीला मोटारीबाहेर ओढून 10 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना इस्सेवाल गावाजवळ घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधीक्षक तरूण रतन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत युवती तिच्या मित्रासोबत मोटारीमधून शनिवारी (ता. 9) रात्री प्रवास करत होती. मोटार स्सेवाल गावाजवळ आल्यानंतर तीन दुचाकीवरून आलेल्यांनी दुचाकी आडवी करून मोटार थांबवली. मोटारीवर दगडांचा मारा केला. युवतीला व तिच्या मित्राला बाहेर ओढून काढले. गावाजवळ असलेल्या कालव्याजवळ नेऊन 10 जणांनी सामूहिक बलात्कार केला.

सामूहिक बलात्कारानंतर युवती आणि तिच्या मित्राला बांधून ठेवले होते. त्यांनी सुटका करुन घेतल्यानंतर पोलिस चौकी गाठली. पीडित युवतीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Woman Dragged Out Of Car and Allegedly Gang Raped By 10 In Punjab