नको त्या क्षणांचा बनवला व्हिडिओ, बायकोची नवऱ्याविरोधात पोलिसात धाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवल्याने बोयकोने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

बरेली : प्रणयाच्या क्षणांचा व्हिडिओ बनवल्याने बोयकोने नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये घडली आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या पती विरोधात पत्नीनेच बारादारी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

हे जोडपे एकत्र राहायचे. मी असा व्हिडिओ बनवायला विरोध केला तेव्हा पतीने मला व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले पण नंतर पतीने त्याच व्हिडिओवरुन माझी ब्लॅकमेलिंग सुरु केली. सतत मला व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली जायची असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी पतीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेचा 29 ऑक्टोंबर 2018 रोजी विवाह झाला. त्यानंतर नवऱ्याने दोघांच्या शारीरिक संबंधांचे त्याच्या मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. जेव्हा पत्नीने आक्षेप घेतला तेव्हा पतीने व्हिडिओ डिलीट करण्याचे आश्वासन दिले होते. पण काही दिवसांनी तिला पतीच्या फोनमध्ये ते व्हिडिओ आढळले. त्यावेळी तिने ते व्हिडिओ डिलीट केले.

नवरा सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत असल्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांना याबद्दल काही सांगितले नाही. 30 जूनला जेव्हा तिला पतीने मारहाण केली तेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली व सात जुलैला बारादारी पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Up Woman Files Fir Against Husband Intimate Moments Video