विवाहबाह्य संबंधामुळे महिलेला सुनावली 'अशी' शिक्षा

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील देवीगाव येथे ही धक्कादायक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

भोपाळः महिलेचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून महिलेला नवऱयाला खांद्यावर घेऊन गावभर फिरवण्याची शिक्षा पचांयतीने सुनावली. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली.

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील देवीगाव येथे ही धक्कादायक व माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. महिलेलचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एका आदिवासी महिलेला पंचायतीने शिक्षा सुनावली. महिलेला नवऱ्याला खांद्यावर घेऊन गावभर फिरवले. महिला नवऱयाला खांद्यावर घेऊन जात असताना वाद्य वाजवली जात होती. शिवाय, शिट्या वाजवून अनेकांचे लक्ष वेधून घेतले जात होते. एक ज्येष्ठ नागरिक महिलेपुढे नृत्य करत असल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. येथील थांदला पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली व पोलिस पथक गावात पाठविण्यात आले. पोलिस अधीक्षक विनित जैन म्हणाले, 'व्हिडिओची तपासणी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.' दरम्यान, महिलेच्या सासरच्या मंडळीने आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनी महिलेला ही शिक्षा सुनावली असतानाही, अद्याप कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही.

Web Title: Woman forced to carry husband as punishment at bhopal