भाचीला दारू पाजून प्रियकराला करायला लावला बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 25 एप्रिल 2018

राजधानी दिल्लीत 13 वर्षीय भाचीला दारू पिण्यास दबाव टाकत प्रियकराला बलात्कार करण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शाहबाद डेअरी येथे घडली. 

भाचीला दारू पिण्यास बळजबरी करत 

नवी दिल्ली : देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यानंतर आता राजधानी दिल्लीत 13 वर्षीय भाचीला दारू पिण्यास दबाव टाकत प्रियकराला बलात्कार करण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शाहबाद डेअरी येथे घडली. 

बलात्काराच्या वाढत्या घटनांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, याबाबत केंद्र सरकारकडून वटहुकूम काढण्यात आला. या वटहुकूमावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली. त्यानंतरही बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दिल्लीच्या शाहबाद डेअरी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस तिच्याच नातेवाईक असलेल्या महिलेने तिला जबरदस्ती करत दारू पिण्यास सांगितले. त्यानंतर तिने आपल्या प्रियकराला तिच्यावर बलात्कार करण्यास सांगितले. 

Rape

बलात्कारानंतर पीडित मुलीच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर तिच्या वडिलांचे तिच्याकडे लक्ष गेले. वडिलांनी पीडित मुलीला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. तिला 24 तास रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र, सध्या तिची प्रकृती ठीक असून, तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, याप्रकरणी 30 वर्षीय महिलेला अटक केली असून, तिला तुरुंगात पाठविले आहे. मात्र, यातील आरोपी मुकेश कुमार फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (रोहिनी) रजनीश गुप्ता यांनी दिली.  

Web Title: Woman forces 13 year old niece to drink lets her boyfriend rape the child in Delhi