17 मुलांना जन्म देणाऱया महिलेचा फोटो व्हायरल...

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

सोशल मीडियावर एका अमेरिकन महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. या महिलेने 17 मुलांना जन्म दिला असून, एक पिता मुलांना सांभाळतानाची छायातित्रे रिचर्ड कॅमोरिंता डे यांनी फेसबुकवरून व्हायरल केली आहेत.

नवी दिल्लीः सोशल मीडियावर एका अमेरिकन महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. या महिलेने 17 मुलांना जन्म दिला असून, एक पिता मुलांना सांभाळतानाची छायातित्रे रिचर्ड कॅमोरिंता डे यांनी फेसबुकवरून व्हायरल केली आहेत. पण, महिलेच्या छायाचित्रामध्ये फोटोशॉपमध्ये छेडछाड केल्याची माहिती पुढे आली आहे.

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...

सोशल मीडियावर एक गर्भवती महिला व लहान मुले असे तीन छायाचित्र व्हायरल होत होती. या महिलेने 17 मुलांना जन्म दिला आहे, असे फेक वृत्त व्हायरल झाले होते. महिलेकडे पाहिल्यानंतर हे वृत्त खरे असावे, असे अनेकांना वाटत होते. रिचर्ड यांनी फेसबुकवर तीन छायाचित्रे अपलोड केल्यानंतर 32 हजारांहून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर करताना 1400 जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. यामुळे ही छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेत आली होती.

अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव; वृद्धही रांगेत...

परंतु, या वृत्ताचा शोध घेतल्यानंतर हे चुकीचे वृत्त असल्याची महिती पुढे आली. शिवाय, महिलेच्या छायाचित्रामध्ये फोटोशॉपमध्ये छेडछाड करण्यात आल्याचेही दिसून आले. यामुळे व्हायरल झालेले वृत्त खोटे निघाले.

नवजात बाळाला कचऱयात टाकून देताना दोघेही रडत होते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman giving birth to 17 identical boys in single pregnancy photo viral