आठवडाभरापासून बेपत्ता होती महिला; परतली घरी, मग...

वृत्तसंस्था
Sunday, 21 June 2020

रस्त्यातच अडवणूक

- संबंधितांवर गुन्हे दाखल

भोपाळ : आपल्या घरातील कोणी व्यक्ती बेपत्ता असली की त्याची शोधाशोध सुरु होते. हरविल्याची तक्रार पोलिसांत पोलिसांत दिली जाते. पण ती व्यक्ती परत मिळाली तर आनंद व्यक्त केला जातो. मात्र, मध्य प्रदेशात एक वेगळाच प्रकार घडल्याचे पाहिला मिळाले. बेपत्ता असलेली महिला आठवडाभरानंतर घरी परतली. जेव्हा ती घरी परतली तेव्हा कोणताही आनंद साजरा न करता उलट त्या महिलेची गावभर धिंड काढण्यात आली. ही घटना राजस्थानमधील झबुआ जिल्ह्यात घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संबंधित महिला आपल्या सासरच्या मंडळींवर नाराज होती. त्यानंतर ती आठवडाभरापासून घरी नव्हती तर कुठतरी बेपत्ता होती. आठवडाभरापासून महिला घरी नसल्याने सासरच्या मंडळींना तिच्यावर संशय आहे. या संशयातून त्या महिलेचे कुठेतरी विवाहबाह्य संबंध असावेत, म्हणून तिला शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तिच्या सासरच्या लोकांनी तिची धिंड काढली. पण धिंड सुरू असताना महिलेने तिच्या पतीला आपल्या खांद्यावर उचलून घ्यावे लागले होते. याबाबतचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनेने दिले आहे.

MP: Woman

रस्त्यातच अडवणूक

माहेरीची मंडळी संबंधित महिलेला घेऊन आठवडाभराने सासरी आली. तेव्हा या सर्वांना रस्त्यातच अडवण्यात आले. नंतर त्या महिलेची गावभर धिंड काढण्यात आली. इतकेच नाही तर तिच्या खांद्यावर पतीलाही बसवण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

संबंधितांवर गुन्हे दाखल

दरम्यान, हा प्रकार झबुआ जिल्ह्यातील कल्याणपुरा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेडा या गावात घडला. पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तर या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. 

Crime

पोलिस अधीक्षक म्हणतात...

याप्रकरणी आठ जणांची ओळख पटली आहे. यातील चौघांना अटक करण्यात आली, अशी माहिती झबुआचे पोलिस अधीक्षक विनीत जैन यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman goes missing for a week forced to carry husband on shoulders as punishment