'व्हॅलेंटाइन डे' दिवशीच घेतला राहुल गांधींचा 'किस'

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

वलसाड (गुजरात): काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी अनपेक्षित धक्का देत एका महिलेने व्यासपीठावर त्यांचा 'किस' घेतला. संबंधित व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राहुल गांधी आज (गुरुवार) गुजरातच्या दौऱयावर आहेत. वलसाड येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राहुल गांधी व्यासपीठावर उपस्थित असताना काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या त्यांचे स्वागत करण्यासाठी व्यासपीठावर आल्या होत्या. यावेळी एका महिलेने अनपेक्षित राहुल गांधी यांच्या गालाचा किस घेतला.

महिलेने घेतलेल्या किस नंतर राहुल गांधी यांच्या चेहऱयावर स्मितहास्य पसरले व त्यांनी महिलांना अभिवादन केले. महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या गळ्यात हार घातल्यानंतर काँग्रेसचा जयघोष केला.

दरम्यान, राहुल गांधी यांना किस करणाऱया महिलेचे नाव कश्मीरा मुंशी असून, त्या महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. कश्मीरा मुंशी व गांधी कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman kisses Rahul Gandhi on stage during Valsad rally at gujrat