'ती' मार खात होती..अन शेजारी व्हीडिओ बनवत होते

योगेश कानगुडे
मंगळवार, 20 मार्च 2018

पृथ्वीवर सर्व गोष्टी निर्माण करताना देवाने माणूसदेखील निर्मिला आणि या मानवाला सगळ्या प्राणीमात्रांपेक्षा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मेंदूदेखील दिला. आपण २१ व्या शतकात प्रवेश केला आणि गेल्या दशकापासून ते आत्तापर्यंत आम्ही आमचा देदीप्यमान विकास केलेला आहे. पण हा विकास होत असताना खरंच या माणसाला माणूसपण राहिलंय का? हा प्रश्‍न मनामध्ये मात्र थैमान घालू लागला आहे.अमानुष कृत्याचं दर्शन आपल्याला वृत्तपत्र व वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा डोळ्यांसमोर येतं तेव्हा मन अस्वस्थ होऊन जाते.

पृथ्वीवर सर्व गोष्टी निर्माण करताना देवाने माणूसदेखील निर्मिला आणि या मानवाला सगळ्या प्राणीमात्रांपेक्षा कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला मेंदूदेखील दिला. आपण २१ व्या शतकात प्रवेश केला आणि गेल्या दशकापासून ते आत्तापर्यंत आम्ही आमचा देदीप्यमान विकास केलेला आहे. पण हा विकास होत असताना खरंच या माणसाला माणूसपण राहिलंय का? हा प्रश्‍न मनामध्ये मात्र थैमान घालू लागला आहे.अमानुष कृत्याचं दर्शन आपल्याला वृत्तपत्र व वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा डोळ्यांसमोर येतं तेव्हा मन अस्वस्थ होऊन जाते. बलात्कारासारखं निंदनीय कृत्य, स्त्रीयांवरील वाढत चाललेले अत्याचार, माणुसकीच्या नावाला काळीमा फासणार्‍या या सर्व गोष्टी कधी थांबणार आहेत?. प्रत्येक माणूस विचारी असतो. माणसाला मेंदू असतो अन् त्या मेंदूत अक्कल ही असतेच. पण त्या अकलेचं आज खोबरं झालेलं आहे. हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे ९० वर्षांच्या एका आजीबाईंना तिच्याच नातीने अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

९० वर्षांच्या एका आजीबाईंना तिच्याच नातीने अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. धक्कादायक बाब ही या आजीला मारहाणीपासून वाचवण्याऐवजी शेजारी या मारहाणीचा व्हिडिओ तयार करत बसले. हा व्हिडिओ पाहून आपले हृदय पिळवटून जाते. ही घटना घडली आहे केरळच्या कन्नूर या गावात. या आजीला मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव दीपा आहे तर आजींचे नाव कल्याणी असल्याचे समजले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपाला अटक केली असून तिच्या विरोधात बेदम मारहाणीसंदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्याच्या मानवी हक्क आयोगाकडेही या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. कल्याणी यांची संपत्ती बेकायदा हडप केल्याप्रकरणीही दीपावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी यांच्यावर आता रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

दीपाने तिच्या आजीला चपलेने मारहाण केली. त्यानंतर तिची आजी म्हणजेच कल्याणी या जोरजोरात आरडाओरडा करू लागल्या. शेजारी धावत आले पण त्यांनी या आजींची मदत करण्याचे सोडून व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. त्यातील काही काही जणांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांपर्यंत पोहचला. मग पोलिसांनी याप्रकरणी दीपाला अटक केली आणि तिची रवानगी पोलीस कोठडीत केली. दीपाने स्वतःच्या आजीला ज्या प्रकारे मारहाण केली ते तर भयंकर आहेच पण शेजाऱ्यांनी जी असंवेदशीलता दाखवली ते पाहून जगात माणुसकी शिल्लक आहे का? हा प्रश्न मनात येतो. कल्याणी यांचाही जबाब नोंदवण्यात आला. माझी नात मला रोज मारहाण करते असे या आजींनी सांगितले आहे. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा आणि वळ आहेत. 

आपल्या आसपास अशा अनेक घटना घडत असतात. त्या सगळ्याच माध्यमांसमोर येतातच असे नाही. या आजीबद्दल शेजाऱ्यांनी संवेदना दाखवली असती तर आजींना मारहाण झाली नसती. लिहायला-वाचायला शिकूनही आपण माणसे वाचायला शिकत नाही हे आजचे जळजळीत वास्तव आहे. 

Web Title: Woman Mercilessly Beats Up Her 90-Year-Old Grandmother In Kerala