दूतावासातील महिलेचा विनयभंग

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

कोलकता : येथील एका विदेश दूतावासातील वरिष्ठ व्यक्तीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.

कोलकता : येथील एका विदेश दूतावासातील वरिष्ठ व्यक्तीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.

याप्रकरणी एका मध्यमवयीन महिलेने शेक्‍सपिअर सरानी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात म्हटले आहे, की बुधवारी रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने आपला विनयभंग केला, अशी माहिती गुन्हे विभागाचे संयुक्त आयुक्त प्रवीण त्रिपाठी यांनी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यावर त्यात एका व्यक्तीची ओळख पटली आहे. रोहित अग्रवाल असे त्याचे नाव असून, तो दक्षिण कोलकत्यातील वाणिज्य महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. रोहितला गुरुवारी अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman molested in Embassy