घरगुती भांडणानंतर महिलेचे कापले नाक

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : राजस्थानातील बारमेर येथे झालेल्या घरगुती भांडणात एका महिलेचे नाक कापण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा सुरु असून, याप्रकरणातील आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

नवी दिल्ली : राजस्थानातील बारमेर येथे झालेल्या घरगुती भांडणात एका महिलेचे नाक कापण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच चर्चा सुरु असून, याप्रकरणातील आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

पुरो देवी आणि भेराराम जाट हे दोघे धूधु गावात राहत आहेत. चार वर्षांपूर्वी पुरो देवी यांनी त्यांच्या मुलीचा विवाह डेरामाराम जाट यांच्याशी लुखू गावात केला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर त्यांची मुलगी सासर सोडून माहेरी निघून गेली. त्यांची मुलगी माहेरी त्यांच्यासोबत राहत होती. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी पुरोने बचदाऊ येथे तिच्या मुलीचा पुन्हा विवाह केला. त्यामुळे या रागात तिच्या पूर्वीच्या सासरकडील लोकांनी पुरोच्या कुटुंबियांशी शुक्रवारी रात्री भांडण झाले. त्यानंतर यादरम्यान पुरोच्या नाकावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. तसेच त्यांनी पुरोच्या पतीलाही लाठीने मारहाण केली गेली.

या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेतली. यातील जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले. येथील प्रशासनाने जखमींवर प्राथमिक उपचार केले असून, पुरोला बारमेर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुरोची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दरम्यान, पुरोच्या जबाबावरून पोलिसांनी दोन आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम 307 आणि 458 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  

Web Title: Woman Nose Chopped Off in Barmer over family Dispute