भोपाळमध्ये महिलेच्या गुप्तांगात बाटली कोंबून बलात्कार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच तिच्या गुप्तांगात दोन बाटल्या आढळून आल्या. आम्ही याबाबत तपास सुरु केला असून, यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

- सुनील श्रीवास्तव, पोलिस निरीक्षक, अशोका गार्डन टाऊन

भोपाळ : भोपाळमध्ये एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. बलात्कारानंतर पीडित महिलेची हत्या करण्यात आली. बलात्कारादरम्यान नराधमाने पीडित महिलेच्या गुप्तांगात बिअरची बाटली कोंबल्याचे आढळून आले. या धक्कादायक प्रकारामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. 

Rape

पोलिसांना पीडित महिलेची ओळख पटली असून, ती सेहोर जिल्ह्यातील इच्छावर टाऊन येथील रहिवासी होती. सध्या ती भोपाळच्या प्रगतीनगर येथे एका पुरुषासोबत एका भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांनी सांगितले, की प्रगतीनगर येथील रहिवाशांनी याबाबत आम्हाला माहिती दिली. रहिवाशांनी सांगितले, की पीडित महिलेच्या खोलीतून दुर्गंधी येत होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी पीडित महिला विवस्त्र अवस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह काही प्रमाणात सडला होता. तिच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

याबाबत अशोका गार्डन टाऊन पोलिस निरीक्षक सुनील श्रीवास्तव यांनी सांगितले, की पीडित महिलेच्या शेजाऱ्यांना वाटले, की ते दोघे रुममध्ये राहणारे पती-पत्नी असतील. मात्र, त्यांच्या वैवाहिक स्थितीविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्या पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच तिच्या गुप्तांगात दोन बाटल्या आढळून आल्या. आम्ही याबाबत तपास सुरु केला असून, यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

Web Title: woman raped in bhopal found beer and soft drink bottles found in private parts