हरियानात विवाहितेवर बलात्कार करून हत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

चंडीगड : हरियानाच्या मेवात जिल्ह्यात एका विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची अन्य चार जणांनी हत्या केली. या प्रकरणातील संशयित व्यक्ती ही सासऱ्यांच्या जवळची असून, त्याने काल रात्री पीडित महिलेला तिच्या वडिलांच्या घरून नेले होते. 

पीडित महिलेला सासरी नेत असताना संशयिताने अन्य चार व्यक्तींसोबत तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करून मृतदेह कचऱ्यात टाकून दिला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक कुलदीपसिंग यांनी सांगितले. येथून जाणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 

Web Title: woman raped in haryana