हल्लेखोरांनी त्यावेळी तोंडावर मास्क घातले होते...

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पंजाबच्या मोहाली जिल्ह्यात एका शिक्षिकेचा शाळेच्या आवारात गोळी घालून खून करण्यात आल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी घडली. तिच्या पश्‍चात पाच वर्षांची मुलगी आहे. सरबजित कौर असे त्या महिला शिक्षकेचे नाव आहे.

चंडीगड : पंजाबच्या मोहाली जिल्ह्यात एका शिक्षिकेचा शाळेच्या आवारात गोळी घालून खून करण्यात आल्याची घटना आज (गुरुवार) सकाळी घडली. तिच्या पश्‍चात पाच वर्षांची मुलगी आहे. सरबजित कौर असे त्या महिला शिक्षकेचे नाव आहे.

खारार येथील शिक्षिका सरबजित कौर या आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आल्या. शाळेच्या आवारात स्कूटर पार्क करत असताना हल्लेखोर तेथे आले आणि त्यांनी कौर यांच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी तोंडावर मास्क घातले होते. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. वाहनावरून आलेले हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले. सीसीटीव्ही कॅमेरात हल्लेखोर पळून जाताना दिसतात.

कौर या खासगी शाळेत पंजाबी आणि फ्रेंच भाषा शिकवत होत्या. कौर शाळेत येण्यापूर्वी हल्लेखोर शाळेच्या परिसरात घुटमळत होते, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या हल्ल्याचे कारण समजू शकले नाही. कौटुंबीक की अन्य कोणत्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman school teacher shot dead at Kharar near Chandigarh