मुलीच्या प्रेम कहाणीचा आईने केला 'द एंड'...

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

युवती व माझ्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, आंतरजातीय असल्यामुळे युवतीच्या आईचा आमच्या विवाहाला विरोध होता.

नागापत्तीनम (केरळ): घराशेजारी राहणारा युवक व मुलीचे प्रेमसंबंध असल्यामुळे आईने मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. गंभीर जखमी झालेल्या युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला अशी, महिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. उमा माहेश्वरी (वय 48) या महिलेने आपल्या 17 वर्षाच्या मुलीच्या अंगावर रॉकेल ओतले व पेटवून दिले. मुलीला पेटवून दिल्यानंतर स्वतःही पेटवून घेतले. यामध्ये दोघीही भाजल्या होत्या. उपचारासाठी दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. आईवर उपचार सुरू आहेत.

घराशेजारी राहणाऱया युवकाने दिलेल्या माहितीनुसार, युवती व माझ्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, आंतरजातीय असल्यामुळे युवतीच्या आईचा आमच्या विवाहाला विरोध होता. प्रेयसी 18 वर्षांची होणार होती. त्यामुळे ती आईकडे विवाहासाठी परवानगी मागत होती. यावरून दोघींमध्ये भांडण झाले आणि पेटवून दिले. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला असून, आमची प्रेम कहाणी अर्धवट राहिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman sets daughter onfire for eloping with dalit youth