भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप करणाऱया महिलेचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 9 एप्रिल 2018

लखनौः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर एका महिला व तिच्या नातेवाईकांनी रविवारी (ता. 8) आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज (सोमवार) सकाळी या महिलेचा मृत्यू झाला. संबंधित महिलेने भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप केला होता.

भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीपसिंग सेंगार व त्यांच्या भावाने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे केली होती. तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे संबंधित महिला व तिच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान महिलेचा आज मृत्यू झाला.

आत्महत्येपूर्वी महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, 'भाजप आमदार कुलदीप सिंह व त्याच्या भावाने माझ्यावर एक वर्षापूर्वी बलात्कार केला होता. बलात्काराची तक्रार करूनही वर्षभरात कोणतीही कारवाई झाली नाही. मलाच वारंवार धमकी दिली जात होती. या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आली. परंतु, काहीही झाले नाही. बलात्कार करणाऱयांना अटक झाली नाही तर आत्महत्या करेल.'

दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर दोन पोलिस अधिकारी व चार पोलिस कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: woman suicide near yogi adityanath home claims rape by bjp mla lucknow