तिला वाटलं आयटीमधील नोकरी जाणार म्हणून...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामध्ये कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आपली नोकरी जाणार या भितीपोटी एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हैदरबाद: माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रामध्ये कर्मचारी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. आपली नोकरी जाणार या भितीपोटी एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोगाकू हारिणी (वय 24) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. पोगाकू ही एका आयटी कंपनीमध्ये ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर काम करत होती. कंपनीने कर्मचारी कपातीची नोटीस दिली होती. ही तरुणी मूळची मेहबूबनगर (तेलंगणा) जिल्ह्यात राहणारी आहे. ती गेल्या अडीच वर्षांपासून आयटी कंपनीत काम करत होती. नोटीस मिळाल्यापासून ती तणावात होती. नोकरी जाण्याच्या भीतीने तिने वसतिगृहात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतचा पुढील तपास सूरू आहे.

दरम्यान, आयटी क्षेत्रात सुमारे 40 हजार कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आयटी कर्मचाऱयांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पण, 80 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांमुळे नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman techie commits suicide in Hyderabad over job loss