आमदारावर बलात्काराचा आरोप असलेल्या युवतीचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

लखनौ- उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार वरुण वर्मा यांच्यासह आठ जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या पीडित युवतीचा मृतावस्थेत आढळून आली आहे.

सुलतानपूर येथील पंचायत भवनजवळ पीडित युवतीचा मृतदेह रविवारी (ता. 12) रात्री आढळून आला आहे. यामुळे वर्मा व इतर आठ जणांवर बलात्कारासह हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. चार वर्षांपुर्वी युवतीवर सामूहिक बलात्कार झाला होता.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमिवर पीडित युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. सुलतानपूर मतदार संघामध्ये समाजवादी पक्षाला या घटनेमुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Woman who accused SP MLA Arun Verma of rape, found dead