'एटीएमबाहेर प्रथमोपचाराची व्यवस्था करा!'

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - एका ज्येष्ठ नागरिकाचा एटीएमच्या रांगेत असताना मृत्यु झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर महिला चळवळीच्या कार्यकर्त्या निलम कातारा यांनी सरकारने एटीएमच्या बाहेर प्रथमोपचाराची व्यवस्था करावी, अशी सूचना केली आहे.

एटीएममधून पैसे काढण्यासाठी पश्‍चिम बंगालमधील हगळी जिल्ह्यातील बांदेल स्थानकानजीक एक ज्येष्ठ नागरिक उभे होते. रांगेत असतानाच त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यांचे निधन झाले. याबाबत ममता बॅनर्जी यानीं ट्‌विटद्वारे माहिती दिली असून नोटाबंदीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "प्रेम आणि औदार्या ही ओळख असलेल्या राज्यातून अशा प्रकारे ज्येष्ठाचा मृत्यु झाला आहे.

सरकारने एटीएमच्या बाहेर प्रथमोपचाराची व्यवस्था करावी तसेच आणखी मृत्यु होऊ नयेत याची काळजी घ्यावी', अशी सूचना कातारा यांनी केली आहे. तर महिला चळवळीच्या कार्यकर्त्या कविता श्रावास्तव यांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नोटाबंदीचा निर्णय हा पुरेशी पूर्वतयारी न करता घेण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना होत असलेला त्रास बंद होण्यासाठी सरकारने मार्ग शोधून काढण्याचे आवाहन श्रीवास्तव यांनी केले आहे.

Web Title: Women activists for setting up first-aid unit near ATMs