कुटुंबाच्या जबाबदारीत महिलाच पुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OB Tamang, Nima Chutran.

कुटुंबाच्या जबाबदारीत महिलाच पुढे

तवांग (अरुणाचल प्रदेश) - तवांगच्या रस्त्यावर सगळीकडे महिला दिसत होत्या... एकीने बाळाला पाठीवर बांधत रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले, तर दुसरीकडे साठी ओलांडलेली एक आजी थेट टेंपोमध्ये समान भरत होती. त्या आजीसोबत इतर तरुणी ही त्या टेम्पोत होत्या. क्षण भरासाठी हे सर्व पाहून थक्क झाल्या सारखं वाटल... पण हे इथल्या रोजच्या कामाचा भाग.

पुरुषांनी बाहेरच्या तर महिलांनी घरच्या जबाबदाऱ्या पार पडाव्यात. हे आपल्या रोजच्या आयुष्यात दिसणारे चित्र. मात्र त्याला अरुणाचल प्रदेश अपवाद ठरत आहे. या राज्यात पुरुषांच्या तुलनेत सर्व ठिकाणी महिला काम करताना दिसतात. मग ते रस्ते बनविणे, कृषी, दुकान, व्यवसाय किंवा सामानाची अनलोडींग व अपलोडींग अशा प्रत्येक ठिकाणी स्त्रिया कार्यरत आहेत.

गेल्या १९ वर्षांपासून ६१ वर्षांच्या चाऊंग लामाऊ तवांगच्या बाजारपेठेत आपल्या भावासोबत दुकानाचे सर्व काम करत आहेत. रोजगार क्षेत्रात महिलांचा सक्रिय सहभागाबाबत त्या म्हणाल्या, " आम्ही घरी बसत नाही. आम्ही पुरुषांबरोबर काम करतो. हे महिला पुरुष समानतेचा उधारण आहे. महिला घरा बाहेर पडून घराची जबाबदारी उचलतात."

रोजगारासाठी पर्याय

अत्यंत वळणाचा रस्ता, डोंगर माथ्यावर वसलेले गाव अशा अरुणाचल प्रदेशात रोजगार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. या राज्यात आयटी, उद्योग किंवा इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसून शेती सुद्धा काही ठराविक पद्धतीत होते. त्यामुळे येथील नागरिकांसाठी उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत हा पर्यटन आहे. होम स्टे, हॉटेल, दुकान, गाडी सुविधा उपलब्ध करणे अशा कामातून येथील स्थानिकांना उत्पन्न मिळवता येते. मात्र अरुणाचलच्या अनेक भागांमध्ये सामान्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा पर्यटक काही ठिकाणी जाण्याचा मोह आवरतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा फटका ही बसतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे झाल्यास पर्यटन वाढेल आणि त्याच बरोबर स्थानिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, असे येथील महिलांनी नमूद केले.

"काम करण्यासाठी मनाची तयारी गरजेची असते. शिक्षण झाले असेल तरच कामाची संधी मिळते असे नाही. येथे सगळ्याच महिला काम करतात. मी स्वतः हॉटेल चालवते आणि आमच्या कुटुंबाची काळजी घेते."

- ओबी तामांग, हॉटेल व्यावसायिका.

"माझं शिक्षण झालेलं नाही. मी शेती करते. यावरच आमचे घर चालते. अशा भागात शेती करणे मोठं मुश्कील काम आहे. "

- निमा चुट्रन, शेतकरी महिला.

Web Title: Women Are In Charge Of Family Situation In Arunachal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top