महिलांचा जन्म पुरुषांना खूष ठेवण्यासाठी नव्हे; सर्वोच्च न्यायालय

पीटीआय
मंगळवार, 31 जुलै 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : महिलांचा जन्म हा फक्त विवाह करण्यासाठी तसेच, पुरुषांना सुखी ठेवण्यासाठी झालेला नाही. एखाद्या महिलेचा विवाह होणार आहे, म्हणून तिचा खतना करणे गैर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

नवी दिल्ली (पीटीआय) : महिलांचा जन्म हा फक्त विवाह करण्यासाठी तसेच, पुरुषांना सुखी ठेवण्यासाठी झालेला नाही. एखाद्या महिलेचा विवाह होणार आहे, म्हणून तिचा खतना करणे गैर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

दाऊदी बोहरा समाजातील खतनाच्या प्रथेविरुद्ध दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खतनासारख्या अनिष्ठ प्रथेमुळे महिलांच्या गुप्ततेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असून, त्यांचा स्वाभिमान धुळीस मिळत आहे. ही प्रथा लैंगिक संवेदनशीलतेच्यादृष्टीने घातक आहे. विवाह करून संसार थाटणे याव्यतिरीक्त महिलांच्या इतर जबाबदाऱ्याही असतात. विवाह करून पतीला सुखी ठेवणे केवळ यासाठी महिलांचे आयुष्य नसते, असे न्यायालयाने सुनावणीत स्पष्ट केले. 

पतीला सुखी ठेवण्याची जबाबदारी फक्त महिलांचीच का, असा प्रश्नही न्यायालयाने या वेळी उपस्थित केला. कोणत्याही मुलीच्या जननेइंद्रियांना हात लावणे हा गुन्हा असून, प्रथा असली तरी, त्याची परवानगी देता येणार नाही, असे मत वकील इंदिरा जयसिंह यांनी व्यक्त केले. खतना या प्रथेवर देशभरात बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

सरकारचा याचिकेला पाठिंबा 
प्रथेच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा खतना करणे गुन्हा असून, या प्रथेवर बंदी आणावी, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलीचा खतना केल्यास सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सरकारने दिली. 

Web Title: Women are not born to keep men happy; Supreme Court