मुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

अहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व महिला बचावली आहे, अशी माहिती अलंग पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

ही हृदयद्रावक घटना भावनगर जिल्ह्यातील पांचपिपला गावात सोमवारी (ता. 15) रात्री घडली. संबंधित महिलेचे नाव गीताबेन भालिया (वय 40) असे असून, मानसिक संतुलन बिघडलेले होते. जेव्हा जेव्हा ती डोळे मिटते, तेव्हा तिला भूत दिसते, असा दावा ती करीत असे. मुलांना घेऊन दर्शनासाठी मंदिरात जात असल्याचे पती धर्मसिंह भालिया याला सांगून ती काल सायंकाळी घराबाहेर पडली. पांचपिपला गावात आल्यानंतर तिने पाचही मुलांना विहिरीत ढकलले आणि स्वतः विहिरीत उडी मारली. यात दीड ते सात वर्षे वयोगटातील एक मुलगा व तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर सर्वांत मोठी आठ वर्षांची मुलगी व गीताबेन बचावल्या. तिला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: women attempted suicide by pushing the children in the well