पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची महिलेला मारहाण ; गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर अटक

पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची महिलेला मारहाण ; गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर अटक

नवी दिल्ली : दिल्लीतील कार्यालयात महिलेला एक तरुण बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ त्याच्या मित्राने पोस्ट केला आहे. अत्यंत हेलावणाऱ्या व व्यथित करणाऱ्या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक दिला. यानंतर तातडीने आरोपीला अटक करण्यात आली. 

रोहित सिंह तोमर असे या तरुणाचे नाव असून तो दिल्ली पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. रोहितने महिलेच्या केसांना धरून जमिनीवर पाडले व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. या घटनेचे चित्रणात "रोहित खूप झाले, बास कर', असे कोणीतरी सांगत असल्याचा आवाज ऐकू येत असला तरी व्हिडिओ चित्रण करणारा किंवा अन्य कोणीही रोहितला मारहाण करण्यापासून रोखले नाही. हा व्हिडिओ 2 सप्टेंबरला चित्रीत केलेला असून ट्‌विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेने आज पोलिसांकडे बलात्काराची लेखी तक्रार दिली. रोहितने आपल्याला उत्तमगरमध्ये मित्राच्या कार्यालयात बोलाविले आणि बलात्कार केला. पोलिसांकडे जाण्याची धमकी दिल्यानंतर त्याने तिला मारण्यास सुरवात केली, असे तिने सांगितले, अशी माहिती पोलिस उपआयुक्त (द्वारका) अँटो अल्फोन्स यांनी दिली. 

पोलिसांकडे आज आणखी एका तरुणीने पोलिसांकडे संपर्क साधला. व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तिची भावी पत्नी असल्याचा दावा तिने केला. एका महिलेला तो निर्दयपणे मारहाण करीत असल्याचे व्हिडिओत पाहून तिने त्याच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com