छेडछाडीस विरोध करणाऱ्या महिलेला मारहाण

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

मणिपूरी (उत्तर प्रदेश) : भरदिवसा बाजारपेठेत स्वत:ची छेडछाड करणाऱ्यास विरोध करणाऱ्या महिलेला जबर मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पीडित महिलेने तक्रार दिली आहे. "मी बाजारात काही लोकांना अजय नावाच्या व्यक्तीच्या दुकानाबद्दल विचारणा करत होते. त्यावेळी आमच्यासोबत आत आल्यास आम्ही सांगतो, असे त्यांनी सांगितले. मी त्यांना व्यवस्थित बोलण्यास सांगितले. मात्र, त्यांनी आम्हाला त्रास देत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या पतीला आणि मला काठीने मारहाण केली', अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. याबाबत किश्‍नाई परिसरातील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आनंद यादव नावाच्या एकाला ताब्यात घेतले असून अन्य दोन आरोपींचा एक विशेष पथक शोध घेत आहे.

याबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक सुनिल सक्‍सेना म्हणाले, "वैद्यकीय तपासणीनंतर आम्ही तक्रार दाखल करून घेतली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून आम्ही एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर काही तासातच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तर, अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही पोलिस उपनिरीक्षक आणि गुप्तचरांचे विशेष पथक तयार केले आहे. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत.'

Web Title: Women brutally beaten for resisting molestation