भारतीय जवान बलात्कारी; महिला त्यांचे गुप्तांग कापतात: आझम खान

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

काश्‍मीर, झारखंड आणि आसाम येथे भारतीय लष्कराच्या जवानांना महिलांनी मारहाण केली आहे. त्यांचे गुप्तांगही कापण्यात आले आहे. भारतीय लष्करामधील बलात्काऱ्यांविरोधात असे कृत्य करण्यास महिलांना भाग पडते

लखनौ - समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते आझम खान यांनी एका नव्या वादास तोंड फोडले आहे. "जम्मु काश्‍मीर व भारतच्या इतर भागांमध्ये लष्कराचे जवान महिलांवर बलात्कार करतात. याचा सूड घेण्यासाठी संतप्त महिलांकडून जवानांचे गुप्तांग कापण्यात येते,' असे धक्कादायक विधान खान यांनी रामपूर येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केले.

"काश्‍मीर, झारखंड आणि आसाम येथे भारतीय लष्कराच्या जवानांना महिलांनी मारहाण केली आहे. त्यांचे गुप्तांगही कापण्यात आले आहे. भारतीय लष्करामधील बलात्काऱ्यांविरोधात असे कृत्य करण्यास महिलांना भाग पडते. भारताला अशा प्रकरणांची लाज वाटावयास हवी. सहा दशकांपासून चालत आलेली शांततेची परंपरा आता मोडण्यात येत असून निवडणुकांऐवजी बंदुकीच्या गोळ्यांचा वापर करण्यात येत आहे. याचे परिणाम आपल्याला दिसून येत आहेत,'' असे खान म्हणाले.

रामपूर हा खान यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या महिन्यात रामपूर येथे दोन महिलांचा तरुणांच्या एका टोळक्‍याने विनयभंग केल्याप्रकरणी बोलताना खान यांनी "छेडछाड नको असेल; तर महिलांना घराच्या उंबऱ्याबाहेर पडू देऊ नका,' असे तारे तोडले होते.

Web Title: Women cut private parts of Army jawans, says Azam Khan