रणरागिणी महिला! ख्रिसमस साजरा करताना राडा घालणाऱ्या हिंदूत्ववाद्यांना लावलं पिटाळून

रणरागिणी महिला! ख्रिसमस साजरा करताना राडा घालणाऱ्या हिंदूत्ववाद्यांना लावलं पिटाळून

नवी दिल्ली: दलित घरातील महिलांच्या घरात घुसून ख्रिसमसचा कार्यक्रम साजरा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना (Christmas prayers in Karnataka) काही महिलांनी चांगलंच पिटाळून लावलं आहे. हा हिंदूत्ववाद्यांचा गट त्यांना ख्रिसमस साजरा करण्यापासून रोखत होता. त्यांचा हल्ला या महिलांनी रोखला आहे. या सगमश्चक्रीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर होतो आहे. या व्हिडीओमधील स्त्रिया गुंडगिरीला बळी न पडता उलट त्यांच्या घरात घुसलेल्या पुरुषांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसून येतात. हा प्रकार गेल्या मंगळवारी तुमाकुरुमध्ये घडला आहे.

रणरागिणी महिला! ख्रिसमस साजरा करताना राडा घालणाऱ्या हिंदूत्ववाद्यांना लावलं पिटाळून
जरी ओमिक्रॉनच्या धोक्याची तीव्रता कमी वाटत असली तरी...; WHOचा गंभीर इशारा

अखेर या प्रकारानंतर पोलिसांना घरात बोलावण्यात आलं. मात्र या वादानंतर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. ही घटना तुमाकुरूच्या कुनिगल तालुक्यातील बिलीदेवालय गावात मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. कुनिगल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू पी यांनी याबाबत सांगितलंय की, दोन्ही गटांकडून वाद झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या, मात्र गुन्हा दाखल झालेला नाही. "आम्हाला फोन आल्यावर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आम्ही दोन्ही गटांशी बोललो. कुटुंब ख्रिसमस साजरे करत होते, पण काही लोकांनी तिथे जाऊन गोंधळ घातला. हा केवळ तोंडी वाद होता आणि कोणताही हिंसाचार यामध्ये झाला नाही. आम्ही गुन्हा दाखल केलेला नाही. असं पोलिस निरीक्षक राजू यांनी म्हटलंय.

तुमाकुरूमधील कुनिगल तालुक्यातील बजरंग दलाचे नेते रामू बजरंगी यांनी म्हटलंय की, गावातील एका ग्रामपंचायत सदस्याच्या लक्षात आलंय की, गावातील रामचंद्रच्या कुटुंबाने गेल्या एक महिन्यापासून घरी ख्रिश्चन प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी बजरंग दलातील काही लोकांसह मंगळवारी संध्याकाळी रामचंद्र यांच्या घरी घुसखोरी केली.

रणरागिणी महिला! ख्रिसमस साजरा करताना राडा घालणाऱ्या हिंदूत्ववाद्यांना लावलं पिटाळून
Sindhudurg District Bank Election: दहशत, धनशक्तीमुळेच भाजप विजयी

बजरंग दलातील या कार्यकर्त्यांनी घरात घुसून वाद घालत ख्रिसमस का साजरे करत आहेत, अशी विचारणा केली. त्यांच्या या प्रश्नावर घरातील रहिवाशांनी प्रतिसाद दिला की ते ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे आहेत आणि ख्रिसमस साजरा करण्यात काही एक गैर नाही.

या जमावाने मग घरातील महिलांना विचारलं की, त्यांनी सिंधूर का लावले नाही? याला उत्तर देताना, नंदिनी या महिलांपैकी एका महिलेने त्यांना निदर्शनास आणून दिलं की, त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. याच्याशी बजरंग दलाचा काही एक संबंध नाही. तसेच घरी ख्रिसमस साजरा करण्यात काहीच गैर नाही. "तुम्ही कोण आहात हे प्रश्न विचारणारे? असा करडा सवालही त्यांनी केला.

घरातील रहिवाशांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला? असं विचारत त्यांचं वाद घालणं सुरूच होतं. या प्रश्नावर महिलांनी उत्तर दिलं की, त्या हिंदू आहेत पण ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. "हे धर्मांतर कुठं झालं आहे? तुमच्याकडे धर्मांतराचा पुरावा काय आहे? यावर आम्हाला ख्रिसमस साजरा करायचा असेल तर ही आमची इच्छा आहे!", असंही ती महिला म्हणताना ऐकू येते.

पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज (PUCL) च्या अहवालात यापूर्वी 2021 मध्ये संपूर्ण कर्नाटकात ख्रिश्चन आणि ख्रिश्चन धर्मावर विश्वास असणाऱ्यांवर झालेल्या हिंसाचाराच्या 39 घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. अनेक घटनांमध्ये, ख्रिश्चन प्रार्थना सभेत व्यत्यय आणण्यासाठी हिंदुत्ववादी गट एकत्र आले होते. या हल्ल्यांमध्ये पोलीस आणि काही प्रकरणांमध्ये मीडियाची हिंदुत्ववादी गटांशी हातमिळवणी असल्याचंही अहवालात आढळून आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com