फिगर सांभाळण्यासाठी महिला टाळतात स्तनपान- पटेल

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

स्वतःची फिगर सांभाळण्यासाठी सध्या स्त्रिया त्यांच्या बाळाला स्तनपान करणे टाळतात, असे वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले आहे.आपली फिगर खराब होण्याच्या भीतीने बाळाला बाटलीने दूध प्यायची सवय आजच्या स्त्रिया लावतात. बाळ जन्मल्यापासूनच त्याला बाटलीने दूध प्यायची सवय लावली जाते. त्यामुळेच त्या बाटलीप्रमाणे बाळाचे नशीब फुटके निघते, असेही त्या म्हणाल्या.

इंदूर (मध्यप्रदेश) - स्वतःची फिगर सांभाळण्यासाठी सध्या स्त्रिया त्यांच्या बाळाला स्तनपान करणे टाळतात, असे वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केले आहे.आपली फिगर खराब होण्याच्या भीतीने बाळाला बाटलीने दूध प्यायची सवय आजच्या स्त्रिया लावतात. बाळ जन्मल्यापासूनच त्याला बाटलीने दूध प्यायची सवय लावली जाते. त्यामुळेच त्या बाटलीप्रमाणे बाळाचे नशीब फुटके निघते, असेही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विवाहित नाहीत असे वादग्रस्त वक्तव्य केले होते, तो वाद अजून निवळलेला नसतानाच त्यांनी हे नवे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांनी त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना नरेंद्र मोदी माझ्यासाठी प्रभू रामचंद्र आहेत असे उत्तर दिले होते.

त्याचबरोबर, राज्यपालांनी महिलांनी केंद्राचा पंतप्रधान उज्ज्वल योजनेचा लाभ घ्यायला हवा असेही यावेळी सांगितले. या योजनेचा लाभ घेतल्यास मुलांना आणि स्त्रियांना धुराच्या त्रासापासून सुटका मिळणार आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Web Title: Women InThese Days Dont Breastfeed Babies As They Fear Their Figure Will Be Affected Says Anandiben Patel