
मुलीच्या प्रेमापोटी नक्षलवाद सोडला
विजापूर - मुलीच्या प्रेमापोटी नक्षलवादी कारवाया सोडत महिला नक्षलवादी शनिवारी छत्तीसगड पोलिसांना शरण आली आहे. सोमली सोडी ऊर्फ वनिता असे या नक्षलवादी महिलेचे नाव असून तिच्यावर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
छत्तीसगडमधील विजापूर येथील नक्षलग्रस्त भागात वनिता सक्रिय होती. वनिता ही बंदी घालण्यात आलेल्या नक्षलवादी संघटनेमध्ये २००३ पासून कार्यरत होती, २०१८ मध्ये तिला ‘कमांडर’ म्हणून कारवाया करत होती. छत्तीसगडमध्ये झालेल्या अनेक नक्षलवादी कारवायांत वनिताचा सहभाग असल्याने गेली अनेक वर्ष पोलिस तिच्या मागावर होते. माओवादी विचारसरणीमधील निरर्थकता आणि भेदभाव याची जाणीव झाल्यामुळे आणि आपल्या मुलीच्या व कुटुंबाच्या प्रेमापोटी आपण नाक्षलवादी कारवाया सोडून शरण आल्याचे पोलिसांना तिने सांगितले. छत्तीसगड सरकारच्या योजनेनुसार वनिताला दहा हजार रुपये मदत म्हणून देण्यात आले आहेत.
वनितावरील आरोप
अवापल्ली येथे २००६ साली झालेल्या स्फोटात आणि पोलिसांवर केलेल्या गोळीबारात हात
राणी बोदली येथे सैन्याच्या तळावरील हल्ल्यात हात
Web Title: Women Naxalites Surrender To Chhattisgarh Police On Saturday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..