विवाहानंतर महिलांनी पासपोर्टवर नाव बदलण्याची गरज नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

नवी दिल्ली- विवाहानंतर महिलांनी पासपोर्टवर नाव बदलण्याची गरज नसल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला विभागाच्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की महिलांनी पासपोर्टसाठी अर्ज करताना लग्नाचे किंवा घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही तसेच पासपोर्ट वर स्वतःच्या आई-वडिलांचे नाव लावायचे की नाही हा निर्णय घेण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे.

प्रंधानमंत्री आवास सारख्या योजनांमधुन सरकारी योजनांच्या लाभार्थी कुटुंबातील महिलांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी सरकारने निर्णय घेतल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की महिला सशक्तीकरणातुनच देश पुढे जाणार आहे व त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, आवश्यक असेल तिथे यापुढही नियमांमध्ये योग्य बदल केला जाईल. 

Web Title: Women need not change names in passport after marriage