प्रेमात धोका: पोटात बाळ असूनही कॉन्स्टेबल लटकली फासावर

प्रेमात धोका: पोटात बाळ असूनही कॉन्स्टेबल लटकली फासावर

आझमगढ : प्रेमात धोका मिळाल्याने उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे एका महिला कॉन्स्टेबलने पोटात बाळ असूनही फाशी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

आझमगढ जिल्ह्यातील फुलपूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पूजा सिंह हिला प्रेमात धोका मिळाल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करतेवेळी ती गर्भवती होती. लल्लन राम या युवकाने बँक मॅनेजर असल्याचे सांगून तिची फसवणूक केल्याचे समोर आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

लाखो रुपयांची हेराफेरी करण्याबरोबरच आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याने बँक मॅनेजर असल्याचे फसवून महिला कॉन्स्टेबलशी लग्न केले आणि चार वर्ष तिच्यासोबत राहिला. त्यानंतर तिचे चार लाख रुपये आणि एक कारदेखील चोरली. पुढे तर त्याने फसवणुकीची परिसीमाच गाठली. महिला कॉन्स्टेबल गर्भवती राहिल्यानंतर त्याने कुटुंबीयांसमोर महिलेचा स्वीकार करण्यास नकार दिला. यामुळे तिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. पूजाचा मृतदेह 7 फेब्रुवारीला घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. त्यानंतर तपास केला असता हे सर्व समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com