
या घृणास्पद कृत्यावर व्यक्त व्हा!
तुमचे मत सोशल मीडियावर #WomenSafety हा हॅशटॅग वापरून ‘सकाळ’ला टॅग करून शेअर करा. तसेच, यावर तुमची मते webeditor@esakal.com वर पाठवा.
पुणे - हैदराबादमधील तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आले. ही घटनाच माणुसकीला काळिमा फासणारी असतानाच देशात त्याहूनही घृणास्पद गोष्ट घडली आहे. एका पॉर्न साइटवर तिचे नाव पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत होते. यातून समाजातील विकृती लक्षात येते. समाजातील ही वृत्ती चीड आणणारी आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
जगातील सर्वांत जास्त पाहिल्या जाणाऱ्या पॉर्न साइट्सपैकी असणाऱ्या या साइटच्या भारत आणि पाकिस्तान व्हर्जनमध्ये तब्बल ८० लाख लोकांनी या तरुणीचा व्हिडिओ सर्च केला. रविवार संध्याकाळपर्यंत तिचे नाव या साइटवर ट्रेंड करीत होते. यामध्ये सर्वाधिक सर्च पश्चिम बंगाल आणि त्यापाठोपाठ तेलंगण राज्यातून केले गेले.
भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ
तिच्या नावाचा टॅग या पॉर्न साइटवरून काढून टाकण्यात यावा, यासाठी change.org वर एक ऑनलाइन मोहीम सुरू करण्यात आली आहे. या साइटवर जाऊन तुम्हीसुद्धा ‘ऑनलाइन पिटीशन साइन’ करून या मोहिमेत सहभागी होऊ शकता.
आणखी वाचा : Chandrayaan 2 : मोठी बातमी! विक्रम लँडर सापडला, नासाने केले फोटो ट्विट
ज्यांना दुसऱ्या व्यक्तीवर अधिकार गाजवायचा असतो अशाच व्यक्तींकडून बलात्कार होतो. बलात्काराचा व्हिडिओ सर्च करणारेही अशाच विकृत मानसिकतेचे असतात. दुसऱ्यांनी केलेल्या विकृत गोष्टींमधून ते आनंद मिळवतात. ते बहुतांश वेळी एकटे असतात, त्यांना नाती टिकवता येत नाहीत.
- डॉ. सागर पाठक, स्त्रीरोगतज्ज्ञ व लैंगिक समुपदेशक
अशा प्रकारच्या विकृतीला ‘मिसिंग टाइल्स’ फिलॉसॉफी म्हणतात. अशा लोकांना चांगली गोष्ट दिसत नाही; परंतु वाईट गोष्ट पटकन दिसते. असे व्हिडिओ सर्च करण्यामागेही हीच कारणे आहेत. परिणामांचा विचार न करता जी गोष्ट केली जाते, त्यातून ही विकृती जन्म घेते. अशा लोकांसाठी समुपदेशनाची गरज आहे.
- स्मिता जोशी, मानसोपचारतज्ज्ञ