मासिक पाळीत महिलांनी प्रार्थना स्थळांत जाऊ नये : हसन

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

काँग्रेस नेते एम.एम. हसन यांनी महिलांबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. "महिलांची मासिक पाळी अपवित्र असते. त्यामुळे या काळात त्यांनी प्रार्थना स्थळांमध्ये जाऊ नये', असा सल्ला त्यांनी दिला आहे.

त्रिवेंद्रम (केरळ) : काँग्रेस नेते एम.एम. हसन यांनी महिलांबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. "महिलांची मासिक पाळी अपवित्र असते. त्यामुळे या काळात त्यांनी प्रार्थना स्थळांमध्ये जाऊ नये', असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हसन यांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर आयोजित समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, "मासिक पाळी ही अपवित्र असते. त्यामुळे या काळात महिलांनी मंदिरात प्रवेश करू नये. या सूचनेमागे वैज्ञानिक कारण आहे. याचे इतर काहीही चुकीचे अर्थ लावू नयेत. या काळात मुस्लिम महिलांनी उपवास करू नये. माझे असे मत आहे की या काळात महिलांचे शरीर अपवित्र असल्याने त्यांनी मंदिरात, मशिदीत किंवा चर्चमध्ये जाऊ नये.' एका मुलीने हसन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, "जर तुम्ही रक्ताच्या बाबतीत बोलत असाल तर तुम्ही आणि मी अपवित्र नाहीत का?', असा प्रश्‍न उपस्थित केला. मात्र हसन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. या प्रकारानंतर सोशल मिडियावर हसन यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे आतापर्यंत माजी अध्यक्ष व्ही. एम. सुधीरन प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिकामे होते. दरम्यान केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी यांनी हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे हसन यांच्याकडे द्यावीत, यासाठी दबाव आणला होता.

Web Title: Women should stay indoors during menstruation: Hassan