महिलेचा अजब कारभार! नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला अन् तरूणीसोबत केलं दुसरं लग्न | 2 Women Marriage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girls Marriage

Women Marriage : महिलेचा अजब कारभार! नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला अन् तरूणीसोबत केलं दुसरं लग्न

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये सध्या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा सुरू आहे. एका विवाहीत महिलेने दुसऱ्या एका मुलीशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या दोघींना गावातीलच एका मंदिरात आपलं लग्न लावलं असून या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Girls Marriage

Girls Marriage

अधिक माहितीनुसार, मौसमी दत्ता आणि मौमिता मजुमदार असं या दोन्ही महिलेंचं नाव असून त्यांनी कुणालाच न सांगता लग्न केल्याची माहिती आहे. या दोघींनी लग्न केल्याची बातमी सोशल मीडियावरून लोकांना दिली. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यामध्ये पंचक्रोशीत या लग्नाची चर्चा सुरू झाली.

या दोघींनी गावातीलच भूतनाथ मंदिरासमोर लग्न केलं. मौसमी दत्ता ही आधी विवाहित होती. तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेऊन हे लग्न केल्याचं समोर आलं आहे.

Girls Marriage

Girls Marriage

मीडिया रिपोर्टनुसार, मौसमी दत्ता या महिलेला दोन मुले आहेत. तिचा नवरा तिला रोज मारहाण करत असायचा. त्यामुळे तिने पतीसोबत घटस्फोट घेतला होता. तर मौमिता मजुमदार या अविवाहित तरूणीशी तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर तिने मौमितासोबत आपली लग्नगाठ बांधली. मौमितानेही मौसमी हिच्या दोन मुलांना स्विकारलं आहे. या लग्नाची गोष्ट वाचून आपल्यालाही धक्का बसला असेल.

Girls Marriage

Girls Marriage

हे लग्न त्यांच्या कुटुंबियांना मान्य नसल्यामुळे दोघीही आता भाड्याच्या घरात राहत असून प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरूषातच असतं का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्या दोघीही आयुष्यभर एकमेकींची साथ देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.