'जीन्स-टी-शर्ट घालणा-या महिलांना समुद्रात बुडवा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

तिरुअनंतपुरम- जीन्स-टी-शर्ट घालणा-या महिलांना समुद्रात बुडवायला हवे, असे महिलांबाबतचे वक्तव्य केरळमधील ख्रिश्चम धर्मगुरुने केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असुन, नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून राग व्यक्त केला आहे.

जॅसमिन पीके नावाच्या एका तरूणीने ख्रिश्चन धर्मगुरूचा हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला आहे. संबंधित व्हिडिओ शालोम टिव्हीवरून घेतल्याचे दिसत असून, 25 फेब्रुवारी रोजी तो व्हॉयरल केला आहे. यू-ट्यूबवर तो 11 महिन्यांपुर्वीच अपलोड झाल्याचे दिसत आहे.

धर्मगुरुने म्हटले आहे की, 'तोकडे कपडे महिला केवळ पुरूषांच्या भावना भडकावण्यासाठीच घालतात. त्यांच्यासोबत काही घडल्यास त्या पुरूषांना दोषी धरतात. मात्र, खरी चूक तर त्या मुलींचीच असते. अशा प्रकारची कपडे घालणाऱया महिलांच्या शरिराला दगड बांधून त्यांना समुद्रात बुडवायला हवे.'

दरम्यान, संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

Web Title: women wearing jeans, T-shirt, wants them drowned in the sea