पतीने संशयावरून पत्नीचे नाक चावून तोडले...

वृत्तसंस्था
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

लखनौः पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचे नाक दाताने चावून तोडले. रक्ताबंबाळ झालेल्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आपण नाही तर तिच्या प्रियकराने नाक तोडले आहे, असे पती सांगतो.

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर मध्ये ही घटना घडली आहे. संबंधित दांपत्याचे 14 वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्यांना तीन मुले आहेत. पलहोरा गावातील अर्जुन आपल्या 37 वर्षीय पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. दारु पिऊन कायम आल्यानंतर त्यांच्यात भांडणे होते. भांडणानंतर मारहाण केली जात असे, असे पूजाने सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पती अर्जुन माझ्यावर सतत संशय घेत असे. दारु पिऊन कायम मारहाण करत असे. मारहाणीला विरोध केल्यावर सासरकडील मला मारायचे. यामध्ये सासू, दीर, जाऊ हे पतीला सहकार्य करायचे. काही दिवसांपूर्वीही आमच्यामध्ये वाद झाला होता. यानंतर पंचायतही भरली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांची समजूत घातली होती. तीज या सणासाठी माहेरी जाते असे म्हटल्यानंतर कुटुंबाने रात्री मारहाण केली. सकाळ झाल्यावर पती दारु पिऊन आला. बांगड्या घेऊन देतो म्हणून तो स्वत:सोबत चल म्हटला आणि गावाबाहेर जाताच भांडण सुरू करून मारहाण करू लागला. यानंतर नाक करकचून चावले अन् तोडले. नाकामधून रक्त येऊ लागल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत पूजाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले."

पुजाने शुद्धीवर आल्यानंतर पतीने आपले नाक चावल्याचे सांगितले. परंतु, तिचे नाक आपण नव्हे तर तिच्या प्रियकराने चावून तोडले आहे, असे अर्जुनने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: womens nose bitten off by her husband at uttar pradesh