इसिसचे आव्हान उभे राहू देणार नाही- राजनाथसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पकडण्यात आलेले दोन्ही दहशतवादी भाऊ असून, ते सोशल मीडियावरून इसिसच्या दहशतवाद्यांशी संपर्कात होते

नवी दिल्ली- भारतात इस्लामिक स्टेट तथा इसिस या दहशतवादी संघटनेला डोईजड होऊ देणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. 
"इसिस हे भारतासाठी आव्हान बनू देणार नाही," असे प्रतिपादन त्यांनी एका राजधानी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना केले. 

इसिसचे दोन संशयित दहशतवादी गुजरातमधील धार्मिक स्थळांमध्ये साखळी बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट रचत असताना नुकतेच पकडले गेले आहेत. पुढील दोन दिवसांत हे स्फोट घडवून आणणार होते. राजकोट आणि भानगर येथील दहशवतादविरोधी पथकाने त्यांचा माग काढत अटक करून हा कट उधळून लावला. या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. 

पकडण्यात आलेले दोन्ही दहशतवादी भाऊ असून, ते सोशल मीडियावरून इसिसच्या दहशतवाद्यांशी संपर्कात होते. त्यांच्याकडून बाँब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. चोटिला आणि यासारख्या धार्मिक स्थळांवर बाँबहल्ले करण्याचा त्यांचा कट होता, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Won't let ISIS become challenge for India, says Home Minister Rajnath Singh