काहीही हं ! लग्नमंडपात नवरी चक्क लॅपटॉप घेऊन आली अन ऑफिसची मिटिंग .....

प्राजक्ता निपसे
Friday, 10 July 2020

काय आहे त्या व्हिडिओमध्ये कि जो एवढा व्हायरल होत आहे. 
लग्न सोडून मंडपामध्येच वधूची ऑफिस मिटिंग सुरू झाली.आणि हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

कोरोना व्हायरसचा भस्मासुर जगात धुमाकूळ घालत असल्यामुळे लॉकडाउनची घोषणा केली होती. त्याचाच परिणाम म्हणून काही ऑफिस कर्मचारी आहेत, त्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास भाग पडले. खुपजणांना आता या वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आला आहे.मग मिम्स करणारे नेटकरी सुद्धा या वर्क फ्रॉम होमवर अनेक मजेदार व्हिडिओ आणि मिम्स व्हायरल करताना दिसत आहे. 

असाच एक भन्नाट व्हिडिओ खूप फेमस झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल कि,एक नववधू आपल्या लग्नाच्या दिवशी थेट स्टेजवरुन लॅपटॉपवर काम करताना आणि फोनवर बोलताना दिसत आहे. शेजारी शेरवानी, फेटा अशा पेहरावात बसलेला पती आणि लेहंगा परिधान करुन लॅपटॉपवर काम करणाऱ्या तरुणीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तर अनेकांनी ही तरुणी ऑफिसचं काम करत असल्याचं म्हटलं आहे.

दिनेश जोशी नामक व्यक्तीने त्यांच्या ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘तुम्हाला घरी बसून कामाचा ताण आला असेल तर हे बघा’ अशा कॅप्शन देऊन दिनेश यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नववधूचा नवरा ती मुलगी नेमके कोणते काम करत आहे, हे तिच्या लॅपटॉपच्या स्क्रीनमध्ये डोकावून पाहत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे अद्याप तरी कळलेले नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा :  तुमच्या फोनमधील ॲप्स सुरक्षित राहन्यासाठी ही जबरदस्त ट्रिक फॉलो करा 

या व्हिडिओवर लोकांच्या भन्नाट कमेंट्स सुरु आहेत ते तुम्हीही वाचाच .
काही युझरने असे म्हटले आहेत की, कामचं सगळं असतं, अशी ही कमेंट केली आहे. तर काही युझरनं नातेवाईकांना टाळण्याचा उत्तम पर्याय आहे, असे सुद्धा म्हटले आहे. त्याचप्रमाने आनखीन काही कमेट्सही आहेत.

१) नवरा म्हणत असेल म्हणून वर्क फ्रॉम वेडिंग 

२)  तिचा बॉस किती खडूस आहे. 

३) स्वतःचे स्टेटस अपडेट करण्यासाठी 

४) झूम कॉलवरील लग्न असणार म्हणूनच लॅपटॉप वापरत असेल . 

५) मुलीच्या बॉसला लग्नामध्ये आमंत्रण नसणार यासाठी 

६) हा नक्कीच लॉकडाउन इफेक्ट आहे .

हेही वाचा : लॅपटॉपची बॅटरी लाइफ Chrome ने वाढणार 

या व्हिडिओला 60 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून काय वाटलं हे कमेंट करुन नक्की सांगा.

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workaholic Bride Captured Working On Laptop On Wedding Day