जमावाच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू 

पीटीआय
गुरुवार, 12 जुलै 2018

जतिन दास (वय 35) असे त्या मृत मजुराचे नाव असून, तो घोराथल गावचा रहिवासी आहे. वधूच्या घरी काल रात्री वराचे आगमन झाल्याने वऱ्हाडी मंडळीकडून फटाके फोडले जात होते. मात्र फटाक्‍याचे काही तुकडे दास यांच्या अंगावर उडाले.

नलबारी/गुवाहटी : विवाहानिमित्त वाजवण्यात येणाऱ्या फटाक्‍याला आक्षेप घेणाऱ्या एका व्यक्तीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. जमावाच्या मारहाणीची ही महिनाभरातील दुसरी घटना होय. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

जतिन दास (वय 35) असे त्या मृत मजुराचे नाव असून, तो घोराथल गावचा रहिवासी आहे. वधूच्या घरी काल रात्री वराचे आगमन झाल्याने वऱ्हाडी मंडळीकडून फटाके फोडले जात होते. मात्र फटाक्‍याचे काही तुकडे दास यांच्या अंगावर उडाले. त्यांनी फटाके वाजवण्याला विरोध केला. तेव्हा वऱ्हाडी मंडळीतील काही जणांनी त्याल माराहण केली. गंभीर जखमी झालेल्या दास यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वऱ्हाडी मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, विवाह समारंभास मनाई केली आहे. 

Web Title: The worker death because of mob in the beat

टॅग्स