पत्नी व मुलांचे गळे चिरून कर्मचाऱ्याची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जुलै 2019

हैदराबादच्या रासायनिक कारखान्यात वरिष्ठ कर्मचारी प्रकाश सिंग (वय 55) यांनी पत्नी व मुलांची गळे चिरून हत्या केली आणि नंतर स्वतःचे जीवन संपविले, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. 

गुरुग्राम ः हैदराबादच्या रासायनिक कारखान्यात वरिष्ठ कर्मचारी प्रकाश सिंग (वय 55) यांनी पत्नी व मुलांची गळे चिरून हत्या केली आणि नंतर स्वतःचे जीवन संपविले, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. 

प्रकाश सिंग हे पीएच.डी. पदवीधारक आहेत. उप्पाल साऊथएंड येथील राहत्या घरी त्यांनी रविवारी (ता. 30) रात्री पंख्याला लटकून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी पत्नी सोनू सिंग (वय 50), मुलगी अदिती (वय 22) आणि मुलगा (वय 13) हे झोपेत असताना धारदार शस्त्राने त्यांचे गळे चिरून हत्या केली.

आत्महत्येपूर्वी सिंग यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यात "मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करू शकत नाही,' असे लिहिलेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रकाश हे मूळचे वाराणसी येथील असून, गेल्या आठ वर्षांपासून गुरुग्राम येथे राहत होते. सोनू सिंग यांची गुरुग्राममध्ये शाळा होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worker from Hyderabad commits suicide after murdering wife and children

टॅग्स