निपाणीत बस बंद मुळे प्रवाशांचे हाल

निपाणीत बस बंद मुळे प्रवाशांचे हाल

निपाणी - मोटार वाहन मसुदा व केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा विविध मागण्यासाठी कामगार संघटनांनी मंगळवारी (ता.८)  पुकारलेल्या बंदला हिंदी क्षेत्रातील कामगारांसह नागरिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे निपाणी शहरातील बस सह बँका दिवसभर बंद राहिल्या. त्यामुळे बस स्थानकात शुकशुकाट  पसरला होता. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. शिवाय शहरातील विविध व्यवसायाच्या उलाढालीवर ही चांगलाच परिणाम जाणवला. 

मंगळवारी देशव्यापी बंद असल्याची माहिती अनेकांना नव्हती. त्यामुळे प्रवाशांसह व्यवसायिक व खासगी कर्मचारी बस स्थानकात येत होते. पण सर्व बस बंद असल्याने त्यांची तारांबळ उडाली. सकाळी दहा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील विविध आकाराच्या बस शहरात येत होत्या. पण नेपाळी आगारातील अधिकाऱ्यांनी त्यांना सेवा बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे अकरानंतर सर्वच बस पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. परिणामी स्थानकात आलेल्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. शिवाय जादा रक्कमेचा भुर्दंडही सोसावा लागला. येथील बसस्थानकाच्या आवारात खासगी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. येथून कागल,  कोल्हापूर, संकेश्वर, बेळगाव येथे खासगी वडाप सोडण्यात येत होत्या. 

बँका आणि टपाल सेवा ही सकाळी बंद होती. त्यामुळे रक्कम काढण्यासाठी शहरातील विविध एटीएम मध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. परिणामी काही एटीएम केंद्रातील रक्कम तासाभरात संपत असल्याने अनेकांना रकमेसाठी धावाधाव करावी लागली. शिवाय शहरातील बाजारपेठेत विविध व्यावसायिकांच्या उलाढालीवर ही बंद चा परिणाम झाला.

शहरातील शाळा आणि महाविद्यालय बंद असल्याची माहिती न मिळाल्याने अनेक विद्यार्थी बस स्थानकावर आले होते. पण सकाळी दहानंतर शाळा महाविद्यालये बंद असल्याचे समजल्यावर  गावाकडे परतण्यासाठी  विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली . तसेच  विविध शाळांच्या परीक्षाही  पुढे ढकलण्यात आल्या.बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने स्थानक परिसरातील रिक्षा व्यावसायिकांना प्रवासी अभावी दिवसभर थांबून राहावे लागत असल्याचे चित्र दिसत होते. एकंदरीत विविध क्षेत्रातील नोकरांनी बंदला पाठिंबा दिल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला. शिवाय निपाणी आगाराला प्रवाशाला भावी लाखो रुपयांचा फटका बसला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com