अखिलेशसाठी नव्हे, लोकांसाठी काम करतो: केशव प्रसाद मौर्य

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

उत्तर प्रदेशमधील वर्तमान सरकाच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त करणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे. "आम्ही अखिलेश यादव यांच्यासाठी नव्हे तर लोकांसाठी काम करतो', अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली आहे.

भुवनेश्‍वर (ओडिशा) : उत्तर प्रदेशमधील वर्तमान सरकाच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त करणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर भाजपने निशाणा साधला आहे. "आम्ही अखिलेश यादव यांच्यासाठी नव्हे तर लोकांसाठी काम करतो', अशी टीका उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना मौर्य म्हणाले, "त्यांनी कोणीशीही आघाडी केली महाआघाडी केली किंवा त्यापेक्षा मोठी आघाडी केली तरीही त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतील. कारण भारताची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. लोकांना भारताला प्रगतीपथावर जाताना बघायचे आहे. ज्यांनी लोकांसमोर विकासाचे खोटे दावे केले त्यांना लोकांनी नाकारले. आम्ही त्यांच्या (अखिलेश यादव) समाधानासाठी काम करत नाहीत. तर 22 कोटी भारतीयांसाठी काम करतो.'

उत्तर प्रदेशचे दुसरे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही यादव यांच्यावर निशाणा साधला. "अखिलेश यादव यांच्यापेक्षा लोकांचे समाधान महत्त्वाचे आहे. आणखी एक महिनाही झाला नाही आणि ते आमच्या कामावर प्रश्‍न उपस्थित करत आहेत. मग एवढी वर्षे त्यांनी सत्ता केली. त्यांचे काय? (त्यांनी काय काम केले?)' असा प्रश्‍न शर्मा यांनी उपस्थित केला.

Web Title: Working for people not for Akhilesh Yadav : Maurya