कार्यशाळेमुळे दृष्टिकोन विस्तारला-आदिती तटकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अदिती तटकरे

कार्यशाळेमुळे दृष्टिकोन विस्तारला-आदिती तटकरे

नवी दिल्ली : ‘‘राज्यातील प्रथमच निवडून आलेल्या आमदारांसाठी संसदेत झालेल्या दोन दिवसांच्या कार्यशाळेमुळे केंद्र व राज्यांच्या अखत्यारीतील विकास योजना, केंद्राकडून मिळणारा निधी व त्याचा विनियोग, प्रश्नोत्तर तासाचे महत्त्व, सुशासन आदी मुद्यांबाबत विस्ताराने माहिती मिळाली. अनुभवी मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याकडून मिळालेल्या या माहितीमुळे आमदार म्हणून पहिल्यांदाच संधी मिळालेल्या माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन विस्तारण्यास निश्चित मदत होईल, ’’ अशी भावना राज्‍याच्या राजशिष्टाचार मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

आदिती यांनी सर्व सत्रांना हजेरी लावली. त्यांनी व्याख्यानांची टिपणेही घेतली. त्या म्हणाल्या, ‘‘दिल्लीचे कामकाज कसे चालते, राज्याबरोबर केंद्राचे परस्परसंबंध आदींबाबतची माहिती मिळाली. पहिल्यांदाच आमदार झालेल्या लोकप्रतिनिधींना ती निश्‍चित उपयुक्त ठरेल.या कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, डॉ. भारती प्रवीण पवार, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले यांच्यासह माजी मंत्री प्रकाश जावडेकर व अरविंद सावंत तसेच कुमार केतकर, प्रियांका चतुर्वेदी या मराठी लोकप्रतिनिधींनी अनुभवही ‘शेअर’ केले.

Web Title: Workshop Expands Perspective Parliament Elected Mla Aditi Tatkare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top